दहावीनंतरचे पर्याय निवडताना?

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो...!

लवकरच तुमचा इयत्ता दहावीचा निकाल लागेल. तसा तुम्ही विचार केला असेलच की दहावी नंतर नेमकं करायचं काय? उपलब्ध असलेले पर्याय, त्यातील संधी या सर्वांचा अभ्यास तुमचा करून झाला असलेच.. आणि सुट्ट्यांच्या प्रवाहामध्ये जर ते पहायचं राहून गेलं असेल तर काळजी करू नका. माझा हा लेख तुम्हाला पुढील करिअर निवडताना छोटीशी मदत नक्कीच करेल.

10वी इयत्तेनंतर प्रवाह निवडताना, लक्षात ठेवण्यासाठी अनेक घटक आहेत:

1. स्वारस्य आणि आवड (Interest and Passion): आपल्या आवडी, सामर्थ्य आणि आवडीचा विचार करा. तुमच्या नैसर्गिक प्रवृत्ती आणि कलागुणांशी जुळणारा प्रवाह निवडा. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयाची आवड असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकता.

2. भविष्यातील उद्दिष्टे (Future Career Goals): तुम्हाला जे करिअर करायचे आहे त्याची चांगली माहिती मिळवा आणि त्यांच्याशी संबंधित शैक्षणिक आवश्यकता (Eligibility) समजून घ्या. आपल्या निवडलेल्या क्षेत्रासाठी आवश्यक असलेले विषय आणि कौशल्ये विचारात घ्या आणि त्या क्षेत्रांमध्ये मजबूत पाया प्रदान करणाऱ्या (म्हणजे बेस पक्का करणाऱ्या) प्रवाहाची निवड करा.

3. शैक्षणिक कामगिरी (Academic Performance): तुमच्या संपूर्ण शालेय शिक्षणादरम्यान वेगवेगळ्या विषयांमध्ये तुमच्या शैक्षणिक कामगिरीचे मूल्यांकन करा. तुम्ही ज्या विषयांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करता ते ओळखा. हे तुम्हाला तुमच्या सामर्थ्यांचे (strong subjects) संकेत देऊ शकते आणि त्यानुसार तुम्ही नक्कीच पुढील पर्याय निवडू शकता.

4. योग्यता आणि कौशल्ये(Aptitude and Skills): तुमची योग्यता आणि कौशल्ये यांचा विचार करा. तार्किकता (logical reasoning), समस्या सोडवणे (problem-solving), विश्लेषणात्मक विचार(analytical thinking), सर्जनशीलता (creativity) आणि संभाषण (Communication) या क्षमतांचे विश्लेषण करा . एक असा प्रवाह निवडा जो तुमच्या सामर्थ्यांशी जुळेल आणि तुम्हाला तुमची कौशल्ये विकसित आणि प्रभावीपणे वापरण्यास अनुमती देईल.

5. बाजारातील मागणी (Market Demand): विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची सध्याची आणि भविष्यातील मागणी विचारात घ्या. काही प्रवाहांमध्ये इतरांच्या तुलनेत उच्च नोकरीच्या शक्यता आणि संधी असू शकतात. योग्य निर्णय घेण्यासाठी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा.

6. समुपदेशन आणि मार्गदर्शन(Counseling and Guidance): शिक्षक, पालक, करिअर समुपदेशक आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांकडून मार्गदर्शन घ्या. त्यांचे मार्गदर्शन हे नेहमी मोलाचे ठरेल. विविध प्रवाहांचे साधक (positives) आणि बाधक (negatives) समजून घेण्यास ते मदत करू शकतात आणि आपली योग्यता आणि स्वारस्यांवर (interests) आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकतात.

पर्याय निवडताना लोक काय म्हणतील?, माझ्या मित्राने/मैत्रिणीने हे निवडले मग मी पण तेच करतो हा विचार मनात अजिबात नका ठेऊ. लक्षात ठेवा की 10 व्या वर्गानंतर प्रवाहाची निवड हा एक महत्त्वाचा निर्णय आहे, परंतु तो अपरिवर्तनीय (reversible) नाही. तुम्ही दहावी नंतर जो पर्याय निवडताय तो जर चुकला तर पुढील चांगल्या करिअरच्या सर्व संधी तुम्ही गमावून बसाल.  

त्यामुळे योग्य अभ्यास करून आणि योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्या.

या पुढील लेखामध्ये आपण आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स मधील संधी थोडक्यात पाहणार आहोत.

©प्रभाकर घाटगे

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपला निकाल पाहू शकता..

mahresults.nic.in

mahahsscboard.in

sscresult.mkcl.org

धन्यवाद ....

woman standing writing on black chalkboard
woman standing writing on black chalkboard

इंजिनियरिंग डिप्लोमा (POLYTECHNIC)

दहावीचा निकाल लागल्यानंतर घाई असते ती अकरावीला योग्य प्रवाहामध्ये प्रवेश घेण्याची. कोणी आर्ट्सला जातं, कुणी कॉमर्स तर कुणी सायन्स. यापेक्षा वेगळा विचार थोडे कमीच विद्यार्थी आणि पालक करतात. अशाच एका पर्यायाबद्दल आपण थोडे जाणून घेऊया.

ज्यांना तांत्रिक शिक्षणाबद्दल आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे डिप्लोमा किंवा polytechnic कोर्स आहे. याला आपण mini engineering देखील म्हणू शकतो कारण इंजिनियरिंग मध्ये असणारे विषय या कोर्स मध्ये शिकवले जातात. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना संबंधित विषयातील क्षेत्रामध्ये लागणारे प्रशिक्षण दिले जाते व संबंधित जॉबरोल साठी तयार केले जाते.

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुमचे दहावीचे मार्क विचारात घेतले जातात. जितके जास्त मार्क तितकं चांगलं कॉलेज. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल, पेट्रोकेमिकल, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन, आयटी, इत्यादी विषयांमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता.

सध्या अनेक कॉलेजमध्ये Artificial Intelligence (AI) नावाची नविन शाखा सुरु करण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता AI ब्रांच ला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यास करिअरच्या चांगल्या संधी पुढे चालून भेटू शकतात.

लक्षात ठेवा, फक्त प्रवेश मिळवणे हे आपले ध्येय नाही तर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून चांगली टक्केवारी शेवटपर्यंत टिकवून ठेवल्यास डिप्लोमाच्या तीन वर्षानंतर चांगल्या पगाराची नौकरी तुम्हाला सहज मिळू शकते. त्याचबरोबर ज्यांना पुढे शिकण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी डिप्लोमा नंतर इंजिनियरिंगच्या थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकता.

डिप्लोमा नंतर जशा खाजगी क्षेत्रामध्ये नौकरी मिळते त्याचप्रमाणे अनेक सरकारी नौकऱ्यांची दारे देखील मोकळी होतात.

तेव्हा वाट कसली पाहता. खाली दिलेल्या लिंक मधील PDF मध्ये डिप्लोमा प्रवेशाची सर्व माहिती दिली आहे. ती नीट वाचा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा...

आपल्याला एखाद्या विशिष्ट ब्रांच विषयी माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कळवा, आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोचवू...

लिंक: https://drive.google.com/file/d/1AkzGaUKDGxel1Jljj0dKj5qXS-iWB9eU/view?usp=sharing

धन्यवाद...!
©प्रभाकर घाटगे